अहिल्यानगरमध्ये वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस   

अहिल्यानगर : नगर शहर व परिसरास काल रात्री वादळी वार्‍यासह जोरदार पावसाने झोडपून काढले. वार्‍याचा जोर अधिक असल्याने शहरातील विद्युत  पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला. नंतरच्या काळात पाऊसहि वाढल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.रात्री वेळ आणि अंधाराचे साम्राज्य सर्वत्र पसरल्याने नागरिकांना आपआपल्या वाहनातून घर गाठण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागले. काल शहरात झालेल्या वादळाचा उपनगरी भागातहि मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. रात्री उशीरापर्यंत पाऊस चालू असल्यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज होऊ शकला नाही. मात्र अंधारामुळे जनजीवन विस्कळीत झाले

Related Articles